सासवड -पुरंदर तालुक्यातील सासवडसह ग्रामीण भागातील 4 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 680 झाली आहे. 27 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
97 जण सध्या विविध रुग्णालयांत उपचार घेत आहेत. त्यापैकी 3 रुग्णांचे खासगी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
यामध्ये सासवड येथील 2 व जेजरी येथील 1 रुग्णाचा समावेश आहे. आस्करवाडी येथील 1 रुग्ण ससून येथे उपचार घेताना पॉझिटिव्ह आढळला आहे. सासवड येथील महिलेचा मृत्यू झाला आहे.