कराची : कराचीमध्ये आज पाच मजली निवासी इमारत कोसळून झालेल्या अपघातात कमीतकमी 4 जण ठार तर 22 जण जखमी झाले. गुलबहार भागात ही इमारत कोसळली असून पोलिस आणि पाकिस्तान रेंजर्स बचावकार्य करत आहेत.
मृतांच्या चौघांपैकी एक महिला असल्याचा संशय आहे. कराचीचे महापौर वसीम अख्तर यांनी 22 जखमींना वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले आहेत. ही इमारत पूर्णपणे जमिनदोस्त झाली आहे, तर शेजारच्या अन्य दोन इमारतींचेही मोठे नुकसान झाले आहे.
सिंधचे मुख्यमंत्री सय्यद मुराद अली शहा यांनी या इमारतीच्या बांधकामाचा सविस्तर अहवाल मागावला आहे. त्यामुळे पडलेल्या इमारतीच्या परवानगीचा प्रश्न चर्चेत आला आहे.
या इमारतीचे बांधकाम बेकायदेशीर करण्यात आले असल्याचा संशय व्यक्त केल जातो अहे. जानेवारीमध्ये कराची शहराच्या प्रशासनाने प्रांताच्या इमारत नियंत्रण प्राधिकरणाला 382 धोकादायक निवासी इमारती रिकाम्या करण्यास सांगितले होते, कोसळलेली इमारतीचा समावेश या यादीत आहे की नाही हे अधिकारी तपासत आहेत.