Satara: माउलींच्या सोहळ्यात 3715 टँकरने पाणी पुरवठा
Satara पालखी सोहळ्यात 578 दिंड्यांचे जिल्ह्यातून मार्गक्रमण झाले. वारकर्यांना शासकीय टँकरच्या 362 खेपा आणि खासगी टँकरच्या 3 हजार 353 खेपा करून, दोन कोटी 21 लाख 95 हजार लिटर (22.19 दशलक्ष लिटर) पिण्याच्या पाणी पुरवण्यात आले.

Satara: संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील चार मुक्कामात वारकर्यांना पिण्याचे स्वच्छ व मुबलक पाणी देण्यासाठी ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने नियोजन करून, तीन हजार 715 टँकरने 22.19 दशलक्ष लीटर पाण्याचे वितरण केले. पाण्याची गुणवत्ता तपासण्यासाठी 3 हजार 716 ओटी टेस्ट करण्यात आल्या.
जिल्ह्यातील लोणंद, तरडगाव, फलटण व बरड या मुक्कामाच्या ठिकाणी आणि मार्गावर लाखो वारकर्यांना स्वच्छ व पुरेशा प्रमाणात पिण्याचे पाणी देण्यात आले. जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष डॉ. प्रिया शिंदे, उपाध्यक्ष राजू भोसले, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांच्या मार्गदर्शनाखाली आणि कार्यकारी अभियंता गौरव चक्के यांच्या नेतृत्वाखाली पालखी मार्गावर पाणी वितरण प्रभावीपणे करण्यात आले.
पालखी सोहळ्यात 578 दिंड्यांचे जिल्ह्यातून मार्गक्रमण झाले. वारकर्यांना शासकीय टँकरच्या 362 खेपा आणि खासगी टँकरच्या 3 हजार 353 खेपा करून, दोन कोटी 21 लाख 95 हजार लिटर (22.19 दशलक्ष लिटर) पिण्याच्या पाणी पुरवण्यात आले. पिण्याच्या पाण्याच्या तीन हजार 716 चाचण्या करून, क्लोरिनचे प्रमाण तपासण्यात आले. ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी, अभियंते, कर्मचारी आणि खंडाळा व फलटण उपविभागातील क्षेत्रीय पथके 24 तास कार्यरत होती. विविध विभागांच्या समन्वयामुळे पालखी मार्गावर पिण्याच्या पाण्याची कमतरता भासली नाही. यातून जिल्हा परिषद प्रशासनाची कार्यक्षमता, समन्वय अधोरेखित झाला.





