सांगवी : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त कै. गणपतराव जगताप प्रतिष्ठान व माजी नगरसेवक राजेंद्र जगताप मित्रपरिवार यांच्या वतीने पिंपळे गुरव येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरास ३५७ रक्तदात्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शिबिराचे उद्घाटन राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष योगेश बहल व शेखर काटे यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी विजूअण्णा जगताप, अतुल शितोळे, अरुण पवार, ॲड. अभिषेक जगताप, विश्वनाथ शिंदे आदी उपस्थित होते. संजीवनी ब्लड बँकेच्या माध्यमातून रक्तसंकलन करण्यात आले. शिबिरास नाना काटे, प्रशांत शितोळे, सुनील कदम, संजय जगताप आदी मान्यवरांनी भेट देत रक्तदात्यांचे अभिनंदन केले. दरम्यान, साईराज रेसिडेन्सी, नवी सांगवी येथे साईराज ज्येष्ठ नागरिक संघाचे उद्घाटन योगेश बहल यांच्या हस्ते करण्यात आले. येथे वाचनालय सुविधा उपलब्ध असून ज्येष्ठ नागरिकांना सर्व वृत्तपत्रे एकत्र वाचता येणार आहेत.