वाघोली -परिसरात अडकलेल्या 341 कामगार, नागरिकांना बुधवारी (दि.13) विशेष रेल्वेने मध्यप्रदेशला रवाना करण्यात आले. महसूल प्रशासनाने केलेल्या नियोजनातून वाघोलीसह हवेली तालुक्यातील 1139 नागरिकांना दोन दिवस पुरेल एवढे खाद्यपदार्थ सेवाभावी संस्था, लोकप्रतिनिधी, प्रशासनाच्यावतीने देण्यात आले आहे. वाघोलीचे मंडलाधिकारी किशोर शिंगोटे, तलाठी बाळासाहेब लाखे यांनी त्यांच्या कार्यालयाकडे जमा असलेल्या माहितीनुसार कामगारांशी संपर्क साधला. बुधवारी (दि.13) सकाळी 15 पीएमपीएमएल, एसटी बसच्या माध्यमातून या नागरिकांना पुणे रेल्वे स्टेशनपर्यंत सोडण्यात आले.