Madhya Pradesh: आचारसंहिता लागू झाल्यापासून आत्तापर्यंत ‘इतक्या’ कोटींचा ऐवज जप्त
Updated On:

भोपाळ – मध्य प्रदेश विधानसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यापासून 40.18 कोटी रुपयांची रोकड, 17 कोटी रुपयांहून अधिक किमतीचे अंमली पदार्थ, मद्य, दागिने आणि एकूण 280 कोटी रुपयांच्या इतर वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत.
राज्यातील 230 विधानसभा जागांसाठी शुक्रवारी मतदान झाले, राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी अनुपम राजन म्हणाले की, निवडणूक वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर आचारसंहिता लागू झाली तेव्हापासून राज्यभर अंमलबजावणी यंत्रणांकडून सातत्याने कारवाई करण्यात आली.
बेकायदेशीर दारू, अंमली पदार्थ, रोख रक्कम, मौल्यवान धातू, सोने, चांदी, दागिने आणि सुमारे 339.95 कोटी रुपयांचे इतर साहित्य फ्लाइंग सर्व्हेलन्स टीम, स्टॅटिक सर्व्हिलन्स टीम आणि पोलिसांच्या संयुक्त पथकाने जप्त केले आहे, असे ते म्हणाले.





