दिल्लीतील 30 टक्के करोना रुग्ण बाहेरील राज्यांचे

नवी दिल्ली – दिल्लीत सध्या उपचार घेणाऱ्या करोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढलेली दिसत असली तरी त्यातील 30 टक्के रुग्ण हे बाहेरील राज्यांतले आहेत,अशी माहिती दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांनी दिली.
त्यांनी सांगितले की खासगी हॉस्पिटल्समध्ये राज्य सरकारने जे आयसीयूबेड्स उपलब्ध करून दिले आहेत त्यातील बहुतांशी बेड याच परराज्यातील रुग्णांनी व्यापले आहेत. दिल्लीत बाहेरून येणारे रुग्ण खासगी रुग्णालयांमध्ये दाखल होत आहेत.
ठराविक चार-पाच खासगी रुग्णालयांमध्येच हे रुग्ण थेट भरती होताना दिसत आहेत. त्यामुळे दिल्लीतील अपोलो, फोर्टिस, मॅक्स अशी हॉस्पिटल कायम फुल दिसत आहेत,असे ते म्हणाले. जैन यांनी सांगितले की रुग्णाच्या वास्तव्याच्या ठिकाणांचा डाटा राज्य सरकार स्वतंत्रपणे ठेवत आहे. त्यातील माहितीच्या आधारे 30 टक्के रुग्ण दिल्लीच्या बाहेरचे असल्याचे दिसून अलो आहे असे ते म्हणाले.
दिल्लीत सध्या आयसीयूबेड्सची संख्या वाढवण्यात आली असून अलिकडेच अशी पाचशे अतिरीक्त आयसीयूबेड्स उपलब्ध करून देण्यात आली असून नॉन आयसीयूबेड्स मध्येही पंधराशेंची वाढ करण्यात आली आहे आणि ही सर्व माहिती दिल्ली करोना ऍपवर उपलब्ध आहे. त्यामुळे त्या आधारे रुग्णांना थेट त्यात्या हॉस्पीटल्सशी संपर्क साधणे सोपे होते अशी माहितीही मंत्र्यांनी दिली.





