तळमावले – खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या बसला वाचाविताना आज गुरुवारी सकाळी एसटी बस चालकाचा ताबा सुटून झालेल्या अपघातात 30 जण जखमी झाले. जानुगडेवाडीनजीक एका धोकादायक वळणावर एसटी बस झाडावर धडकून हा अपघात झाला. जखमींमध्ये शालेय विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. या अपघातामधील तीस जखमींपैकी चार जण गंभीर असल्याने त्यांना कराड येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तर इतर जखमींवर ढेबेवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याबाबत माहिती अशी पाटण एसटी आगाराची सळवे- पाटण ही सकाळी साडेआठ वाजता सळवे येथून पाटणकडे जाणारी एस. टी.बस जानुगडेनजीक एका धोकादायक वळणावर सकाळी नऊच्या सुमारास झाडावर धडकली. यामध्ये सळवे, सणबूर, महिंद, बाचोली, बनपुरी, भालेकरवाडी आदी वाडीवस्तीतील प्रवासी त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी बस खचाखच भरली होती. यावेळी जानुगुडेवाडीनजीक कराडकडून येणारी खासगी प्रवासी बस अचानकपणे समोरुन भरधाव वेगाने आल्याने एसटी बसचालकाचा बसवरील ताबा सुटल्याने बस रस्त्याच्या बाजूला असलेल्या झाडावर धडकली. यामध्ये बस चालकासह बसमधील 30 जण जखमी झाले. जखमींपैकी बहुतेकांच्या डोक्याला आणि तोंडाला जखमा झाल्या आहेत. जखमींची नावे – या अपघातमध्ये जखमींमध्ये सरिता धनाजी जाधव (वय 53), सीताबाई नायकु मगरे (वय 61), रंजना सुरेश मगरे (वय 58), बाळाबाई शिवाजी मगरे (वय 58), शोभा भगवान मगरे (वय 50), निर्मला अशोक मगरे (वय४२), शोभा परशुराम जाधव (वय 65), शारदा सोनवणे (वय 50), छाया तानाजी जाधव (वय 44), धनाजी अंतू जाधव (वय 58 सर्व रा. सणबूर ता.पाटण). तुकाराम ज्ञानू भाईगडे (वय 59). तुकाराम गणपती यादव (वय 50), संपदा हनुमंत पुजारी (वय 50), शारदा सुरेश परीट (वय 50), यश जालिंदर बोरगे (वय 17), रोहिणी राजाराम गुरव (सर्व रा. सळवे), जिजाबाई जयसिंग चोरगे (वय 70), सुमन वसंत चोरगे (वय 60 सर्व रा. शिंदेवाडी), कमल शिवाजी जगदाळे (वय 60), बाळू नाना साळुंखे (वय 56), पल्लवी सुमित पवार (वय 26), सीताबाई वसंत लोहार (वय 50), श्रावणी सतीश पाटील (वय 15), आराध्या सतीश पाटील (वय 13), प्रगती रवींद्र पाटील (वय 15), समर्थ विक्रम जगदाळे (वय 19 सर्व रा. बनपुरी) मालन बाळासो साळुंखे (वय 64), जया बाळासाहेब साळुंखे (वय 68 सर्व रा. महिंद) यांचा समावेश आहे. यापैकी निर्मला अशोक मगरे, पल्लवी अमित पवार, संभाजी सीताराम कुंभार हे गंभीर जखमी असून त्यांना पुढील उपचारासाठी कराडला पाठविण्यात आले आहे. या अपघातामध्ये चालक आरिफ निजाम मुल्ला (वय ५७ रा. कोळे), वाहक आर. एम. काळे (वय ५७ रा. मालदन) हेही जखमी झाले आहेत. या अपघाताची ढेबेवाडी पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे. अपघातानंतर जखमींच्या मदतीसाठी सामाजिक कार्यकर्ते अजित मोहिते, मनोज मोहिते, नानासाहेब साबळे, सचिन जाधव आदींनी सहकार्य केले. किरकोळ जखमी विद्यार्थी अपघात घडताच पळाले.. या अपघातामध्ये बसमधील सर्वच प्रवासी जखमी झाले त्यापैकी वयोवृद्ध आणि काही मोठ्या प्रमाणात इजा झालेल्या जखमी प्रवाशांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर बहुतेक किरकोळ जखमी असलेले विद्यार्थी हा अपघात झाल्यानंतर घराकडे पळून गेले.