डेन्मार्कमध्ये सापडली 3 हजार वर्षे जुनी ‘तलवार’; तलवारीची स्थिती पाहून संशोधक ‘कोड्यात’

कोपेनहेगन – डेन्मार्कमध्ये एका मैदानात पुरातत्व खात्याच्या संशोधकांना तब्बल ३००० वर्षे जुनी तलवार सापडली आहे. हि तलवार कास्य धातूची बनवण्यात आली असून इतक्या वर्षानंतरहि तलवार सुस्थितीत असल्याने संशोधक कोड्यात पडले आहेत.

या तलवारीला लावण्यात आलेली लाकडी मूठसुद्धा सुस्थितीत आहे. ओडेन्स सिटी म्युझियमचे मुख्य संशोधक जेस्पर हॅन्सन यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, तलवारीचा हा शोध खूपच महत्वाचा आहे कारण हि तलवार अत्यंत चांगल्या स्थितीत असल्याने त्यावर अधिक संशोधन करून अधिक माहिती मिळवणे शक्य आहे.

डेन्मार्कमधील तिसऱ्या सर्वात मोठ्या बेतात म्हणजेच वेस्ट फूनेन येथे खोदकाम सुरु असताना हि तलवार सापडली. या तलवारीवर काही अलंकारही असून पुरातन काळातील एखाद्या प्रथेप्रमाणे हि तलवार पुरण्यात अली असावी. हि तलवार पुरण्यापूर्वी ती एका खास प्रकारच्या कापडात गुंडाळण्यात अली होती. पण ते कापड जीर्ण झाल्याचे संशोधकांच्या लक्षात आले.

अधिक संशोधनासाठी उपयुक्त असलेले ऑर्गेनिक मटिरियल अद्यापही या तलवारीवर उपलब्ध आहे. हि तलवार कास्य धातूची आहे तांबे आणि टिन या धातूंचे मिश्रण करून कास्य धातू बनवण्यात येतो. त्यामुळे तालवारीसारख्या वस्तू अधिक मजबूत होतात.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.