डोंबिवलीत 3 मजली इमारत कोसळली; ढिगाऱ्याखाली 3 जण अडकल्याची शक्यता
Updated On:

मुंबई – येथील डोंबिवलीत (Dombivli) शुक्रवारी 3 मजली इमारत कोसळली. या इमारतीखाली काही जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. महापालिकेचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून घटनास्थळी युद्धपातळीवर बचाव मोहीम राबवली जात आहे.
डोंबिवलीतल्या न्यू अहिरे रस्त्यावर ही 3 मजली इमारत होती. या इमारतीला तडे गेल्याचे नुकतेच स्पष्ट झाले होते. त्यानंतर महापालिकेने ही इमारत धोकादायक ठरवून तेथील रहिवाशांना नोटिसाही बजावल्या होत्या. त्यामुळे ही इमारत वेळीच रिकामी करण्यात आली होती.
त्यानंतरही या ठिकाणी 2 ते 3 जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. “आदिनारायण’ (Adinarayan building collapsed) असे कोसळलेल्या इमारतीचे नाव असल्याची माहिती आहे.





