मांडवगण फराटा : शिरूर तालुक्यातील मांडवगण फराटा येथील 65 वर्षीय पुरुषाचा, सादलगाव येथील 30 वर्षीय महिला व कोळगाव डोळस येथील 32 वर्षीय कामगारांचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला असल्याची माहिती मांडवगण फराटा आरोग्य केंद्राच्या आरोग्य अधिकारी डॉ. मंजुषा सातपुते -इसवे यांनी दिली आहे.
मांडवगण फराटा येथील 6 व्यक्ती आजारी असल्याने अहमदनगर येथे उपचारासाठी जात होते. त्यावेळी त्यांना कोरोनाचा संसर्ग झाला असल्याचे बोलले जात आहे. त्यांना सर्दी, खोकला, ताप याचा त्रास होत असल्याने त्यांचा स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आला होता. त्यात त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. या व्यक्तीच्या 13 जण संपर्कात आले असून सर्वांना क्वारंटाइन करण्यात आले आहे. सादलगाव येथील दवाखान्यात काम करणाऱ्या कर्मचाऱ्याच्या पत्नीचाही कोरोना अहवाल आज पॉझिटिव्ह आला आहे.