मुंबई – पुण्यातील किवळे येथे होर्डिंग कोसळल्याने पाच जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक सोमवारी संध्याकाळच्या सुमारास घडली होती. या घटनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या दुर्घटनेतील मृत नागरिकांच्या कुटुंबियांना तीन लाखांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विटरच्या माध्यमातून आर्थिक मदत जाहीर केली आहे. कात्रज-देहू मार्गावरील किवळे ओव्हरब्रीज सर्व्हिस रोडवर वादळी वाऱ्यामुळे होर्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनेत पाच जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले असून मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी तीन लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे, असे त्यांनी म्हटले आहे.