Mumbai : होर्डिंग कोसळून झालेल्या अपघातात 3 ठार, 59 जखमी; उच्चस्तरिय चौकशीचे आदेश

मुंबई – वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसामुळे राजधानी मुंबईत अनेक ठिकाणी अपघाताच्या घटना घडल्या. कुठे झाडे पडली, कुठे पत्रे उडाले, टाॅवर कोसळले.. सर्वात मोठी दुर्घटना म्हणजे घाटकोपर पूर्व परिसातील पंतनगर येथील पोलीस ग्राउंड पेट्रोल पंप, ईस्टर्न एक्स्प्रेस हायवे येथे पेट्रोल पंपावर मोठे होर्डिंग कोसळले. या दुर्घटनेत सायंकाळी आठ वाजताच्या सुमारास मिळालेल्या माहितीनुसार, 3 जणांचा मृत्यू झाला असून 59 जण जखमी झाले आहेत.
#WATCH | Maharashtra: Injured in the Ghatkopar hoarding collapse incident brought to Rajawadi Hospital, Ghatkopar for treatment.
Till now 67 people have been rescued, says NDRF
The NDRF team is present at the spot and the rescue is underway. https://t.co/03aE3fCkOn pic.twitter.com/EiOXGwgK21
— ANI (@ANI) May 13, 2024
या दुर्घटनेतील 67 जणांना वाचवण्यात यश आल्याची माहिती एनडीआरएफ पथकाने दिली आहे. एनडीआरएफचे पथक घटनास्थळी बचावकार्य करत आहेत. जखमींना उपचारासाठी राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
घाटकोपर भागात होर्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनेत आतापर्यंत 47 नागरिकांना बाहेर काढण्यात आले आहे. मुंबई पोलिस, महापालिका, आपत्ती व्यवस्थापन असे विभाग समन्वय साधून असून, अडकलेल्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न युद्धस्तरावर करण्यात येत आहेत. जखमींवर राजावाडी रुग्णालयात उपचार करण्यात…
— Devendra Fadnavis (Modi Ka Parivar) (@Dev_Fadnavis) May 13, 2024
उच्च स्तरीय चौकशीचे आदेश –
घाटकोपर भागात होर्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनेत मुंबई पोलिस, महापालिका, आपत्ती व्यवस्थापन असे विभाग समन्वय साधून असून, अडकलेल्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न युद्धस्तरावर करण्यात येत आहेत. जखमींवर राजावाडी रुग्णालयात उपचार करण्यात येत असून, त्यांना सर्वतोपरी सहाय्य करण्यात येईल. या घटनेची उच्चस्तरिय चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
Maharashtra | Ghatkopar hoarding collapse incident | Maharashtra Deputy CM Devendra Fadnavis has cancelled his Lok Sabha campaign and public meeting in the Mulund area after the hoarding collapse incident at Ghatkop.
Dy CM will shortly meet the affected people in the incident. https://t.co/XGqDyQjIuS
— ANI (@ANI) May 13, 2024
अनेक ठिकाणी अपघाताच्या घटना –
दरम्यान, आज दुपारपासून मुंबईतील विविध भागात वादळी वाऱ्यासह पाऊस सुरु झाला होता. विविध ठिकाणी दुर्घटना घडल्या आहेत. शहरातील घाटकोपर, वडाळा, भायखळा परिसरात अपघाताच्या घटना घडल्या आहेत. त्यामध्ये, घाटकोपर येथील पेट्रोल पंपाववर महाकाय होर्डींग कोसळल्याने तब्बल 70 ते 80 गाड्या या बॅनरखाली अडकल्या होत्या.
Maharashtra | 54 people reported injured and over 100 feared trapped after a hoarding fell at the Police Ground Petrol Pump, Eastern Express Highway, Pantnagar, Ghatkopar East. Search and rescue is in process: BMC https://t.co/iFVxcHBQ4R
— ANI (@ANI) May 13, 2024





