3 दिवसांपूर्वी आव्हाड होते करोना पॉझिटिव्ह; राष्ट्रवादी नगरसेवकाचा खुलासा

Updated On:

मुंबई – राष्ट्रवादी नेते आणि राज्य गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड होम क्वारंटाइन झाल्यानंतर त्यांनाही करोनाची लागण झाल्याच्या बातम्या पसरल्या आहेत. मात्र, करोनाची टेस्ट निगेटिव्ह आल्याचे जितेंद्र आव्हाडांनी स्पष्ट केले आहे. परंतु, जितेंद्र आव्हाड करोना पॉझिटिव्ह होते, असा धक्कादायक खुलासा राष्ट्रवादीच्या एका नगरसेवकाने केला आहे.

ठाणे मनपाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक मिलिंद पाटील यांनी तीन दिवसांपूर्वीच जितेंद्र आव्हाडांची टेस्ट पॉझिटिव्ह आल्याचा खुलासा केला. ते म्हणाले कि, तीन दिवसांपूर्वीच जितेंद्र आव्हाड यांचे करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले होते. पण तीन दिवसांच्या उपचारानंतर त्यांच्या दोन चाचण्या निगेटिव्ह आल्या आहेत. त्यांच्यासोबत काम करणाऱ्या सर्व ७ ते ८ जणांना करोनाची लागण झाली आहे, असे त्यांनी  सांगितले.

आव्हाडांच्या मदतीने आम्ही खूप लोकांपर्यंत मदत पोहोचवत होतो. आम्ही त्यांच्या संपर्कात होतो. म्हणून आमचीही चाचणी करून आम्हाला क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात येणार आले आहे. यामुळे मी जनतेला जी रोज मदत करत आहे. ती आता करू शकत नाही. याची आम्हालाही खंत आहे, असेही मिलिंद पाटील म्हणाले आहेत. 

दरम्यान, एका पोलिस कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. या पोलिसाच्या संपर्कात आल्यामुळे जितेंद्र आव्हाड यांनी स्वत:ला होम क्वारंटाइम करुन घेतले. आव्हांडाच्या बंगल्यावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची कोरोना तपासणी करण्यात आली होती. बंगल्यामध्ये काम करणाऱ्या १६ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये जितेंद्र आव्हाड यांच्या सुरक्षा व्यवस्थेतील पाच पोलीस कर्मचारी, बंगल्यातील सहाय्यक, नोकर, स्वयंपाकी, स्वच्छता कर्मचारी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचाही समावेश आहे.

आणखी संबंधित बातम्या

Khavdya Dongar Case : खवड्या डोंगर प्रकरणात नवा ट्विस्ट ! आई संगीता हीचा 'तो' व्हिडिओ समोर

2026-08-23 17:53:49

Khavdya Dongar Case : खवड्या डोंगर प्रकरणात नवा ट्विस्ट ! आई संगीता हीचा 'तो' व्हिडिओ समोर

Chandgude Family Case : छत्रपती संभाजीनगरच्या कुणाल चांदगुडे प्रकरणाला नवं वळण; 'त्या दिवशी....', नातेवाईकांचा मोठा दावा

2026-08-22 22:35:45

Chandgude Family Case : छत्रपती संभाजीनगरच्या कुणाल चांदगुडे प्रकरणाला नवं वळण; 'त्या दिवशी....', नातेवाईकांचा मोठा दावा

Maharashtra Politics : ठाकरेंसह शरद पवारांना मोठा धक्का ! 'या' बड्या नेत्यासह शेकडो कार्यकर्त्यांचा शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश

2026-08-22 18:47:41

Maharashtra Politics : ठाकरेंसह शरद पवारांना मोठा धक्का ! 'या' बड्या नेत्यासह शेकडो कार्यकर्त्यांचा शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश

Sambhajinagar : खवड्या डोंगरावरील प्रकरणावर कुणालच्या आत्याची प्रतिक्रिया; अवघा महाराष्ट्र सुन्न...

2026-08-22 17:29:46

Sambhajinagar : खवड्या डोंगरावरील प्रकरणावर कुणालच्या आत्याची प्रतिक्रिया; अवघा महाराष्ट्र सुन्न...

Cancellation of Additional Surcharge : गणेशोत्सवासाठी बसच्या ग्रुप बुकिंगवरील 30 टक्के अतिरिक्त अधिभार रद्द

2026-08-21 16:22:46

Cancellation of Additional Surcharge : गणेशोत्सवासाठी बसच्या ग्रुप बुकिंगवरील 30 टक्के अतिरिक्त अधिभार रद्द