#Crime : सरकारी नोकरीच्या बहाण्याने 3.50 लाखांची फसवणूक
Updated On:

सातारा ( प्रतिनिधी ) : सातारा येथील एकाला नोकरी लावतो असे सांगून त्याच्या वडिलांकडून साडेतीन लाख रुपये घेवून फसवणूक केल्याप्रकरणी अज्ञातावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी की, तुमच्या मुलाला ओएनजीसी कंपनीत नोकरी लावतो असून सांगून एकाने राजेंद्र जगन्नाथ जगताप (वय 55, रा. 134, केसरकर पेठ, सातारा) यांच्याकडून साडेतीन लाख रुपये घेतले. हा प्रकार दि. 26 नोव्हेंबर 2020 ते दि. 7 जानेवारी 2021 या कालावधीत घडला आहे.
दरम्यान, आपली फसवणूक झाली आहे, असे लक्षात येताच राजेंद्र जगताप यांनी अज्ञाताच्याविरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात फसवणुक झाली असल्याची तक्रार दिली. यानंतर अज्ञातावर गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक संजय पतंगे करत आहेत.





