सातारा – जिल्ह्यातील २८ जणांचा करोना रिपोर्ट पाँझिटिव्ह आला असून त्यामुळे जिल्ह्यातील करोनाग्रस्तांची संख्या ९१९ झाली आहे.
विविध रुग्णालयांत व करोना केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या जिल्ह्यातील २८ नागरिकांचा अहवाल करोना पॉझिटिव्ह आला असून १८५ नागरिकांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
या करोनाबाधित २८ रुग्णांमध्ये २१ पुरुष व ७ महिलांचा समावेश असून यात मुंबई, ठाणे, शारजहा येथून प्रवास करुन आलेले ६ प्रवासी, १८ िकटसहवासातील आणि ४ सारीचे रुग्ण आहेत.
बाधित रुग्णांमध्ये वाई तालुक्यातील कडेगाव येथील ३४ वर्षीय पुरुष, पसरणी येथील ४८ वर्षीय पुरुष, अमृतवाडी येथील ५० वर्षीय पुरुष, बावधन येथील ५७ वर्षीय पुरुष.,
खटाव तालुक्यातील मायणी येथील २९ वर्षीय पुरुष.,
सातारा तालुक्यातील धावली (रोहोट) येथील ४५ वर्षीय महिला, राजापुरी येथील ३९ वर्षीय पुरुष, पाटखळ माथा येथील २८ वर्षीय पुरुष.,
खंडाळा तालुक्यातील शिंदे वस्ती (लोणंद) येथील ३८ वर्षीय महिला, आसवली येथील २७ वर्षीय पुरुष.,
पाटण तालुक्यातील उरुल येथील ६० वर्षीय पुरुष.,
कराड तालुक्यातील तारुख येथील वय २१, २२ वर्षीय युवक तसेच वय २७, २८ व ४८ वर्षीय पुरुष आणि वय ४५ व ५० वर्षीय महिला, चरेगाव येथील ४ वर्षीय बालक, वय ३८ व ३६ वर्षीय पुरुष आणि ३२ वर्षीय महिला, बनवडी येथील २९ वर्षीय पुरुष, कराड शहरातील शनिवार पेठेतील ७५ वर्षीय पुरुष.,
कोरेगाव तालुक्यातील नागझरी येथील २६ वर्षीय पुरुष.,
जावळी तालुक्यातील रामवाडी येथील ६५ वर्षीय पुरुष व ६० वर्षीय महिला, आखेगनी (रांजणी) येथील ४२ वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे.