नाजरेरियात अपहरण झालेल्या 279 मुलींची सुटका

गुसाऊ (नायजेरीया) – नायजेरीयातील वायव्येकडील जामफारा राज्यातील एका बोर्डिंग स्कूलमधून गेल्या आठवड्यात अपहरण झालेल्या शेकडो नायजेरियन विद्यार्थिनींना सोडण्यात आले आहे, अशी माहिती या राज्याच्या गव्हर्नरनी आज दिली. सर्वच्या सर्व 279 मुलींना मुक्त करण्यात आले आहे, असे झमफाराचे गव्हर्नर बेलो मटावळे यांनी जाहीर केले.

शुक्रवारी जंगेबे शहरातील शासकीय कन्या कनिष्ठ माध्यमिक विद्यालयातून बंदूकधाऱ्यांनी मुलींचे अपहरण केले होते. नायजेरियामध्ये अशा प्रकारे शाळकरी विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणावर अपहरण केले जात असते. त्यातील ही सर्वात अलिकडील घटना होती. आज या सर्व मुलींची सुटका झाली. शेकडो मुलींना फिकट निळ्या रंगाचा हिजाब घातलेल्या मुलींना गुसाऊ येथील राज्य शासनाच्या कार्यालयात बसलेल्या असोसिएटेड प्रेसच्या रिपोर्टरने पाहिले.

या मुलींची सुटका झाली असल्याचे वृत्त जाहीर करताना आपल्याला खूप आनंद होतो आहे. आपल्या कन्या सुरक्षित असल्याचा आनंद सर्व नायजेरियन नागरिकांसह साजरा करण्यात मलाही आनंद होतो आहे. असे मटावळे यांनी ट्‌विटरवरच्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.