राज्यात २६ लाख ९ हजार लोकांनी घेतला शिवभोजनाचा लाभ
Updated On:

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांची माहिती
मुंबई : राज्यात दि. 1 जुलै ते दि . 27 जुलै पर्यंत 876 शिवभोजन केंद्रातून पाच रूपये प्रति थाळी याप्रमाणे 26 लाख 9 हजार 164 गरीब व गरजू लोकांनी शिवभोजनाचा लाभ घेतला असल्याची माहिती अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली.
राज्यात एप्रिल महिन्यात 24 लाख 99 हजार 257, मे महिन्यात 33 लाख 84 हजार 040, जून महिन्यात 30 लाख 96 हजार 232, जुलै मध्ये आतापर्यंत 26 लाख 9 हजार 164 आणि असे एकूण दि. 1 एप्रिल ते दि . 27 जुलै या कालावधीत 1 कोटी 15 लाख 88 हजार 693 गरीब व गरजू लोकांनी शिवभोजनाचा लाभ घेतला आहे.





