शिरूर -तालुक्यातील 9 गावात 26 करोनाबाधित रुग्ण आढळले असून दोघांचा मृत्यूही झाला आहे. कोविड केअर सेंटर मधून आज 70 जनांचे करोना तपासणीकरिता नमुने पाठवले आहेत. एकूण बाधितांची संख्या 783 इतकी झाली आहे.
शिरूर शहर 5, कोरेगाव भीमा 2, रांजणगाव गणपती 3, शिक्रापूर 3, सणसवाडी 5, डिंग्रजवाडी 5, धामारी 1, गणेगाव खालसा 1, कारेगाव 1 असे 9 गावांत 26 रुग्ण आढळले आहेत.
शहरात एकाचा मृत्यू
शिरूर शहरात आज 5 करोना बाधित रुग्ण आढळले असून एकाचा मृत्यू झाला. शहरातील बाधितांचा आकडा आता 147 एवढा झाला आहे. मारुती आळी येथील 62 वर्षे पुरुषाचा करोनामुळे मृत्यू झाला. सय्यद बाबा नगर येथे पुरुष, रेव्हेन्यू कॉलनी पुरुष, मुंबई बाजार पुरुष, तरुण, 28 वर्षीय महिला असे पाच रुग्ण आढळले आहेत.