सातारा/कराड -क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयात, वाई कोव्हिड केअर केंद्रात व ब्रह्मपुरी येथील कोव्हिड केअर केंद्रातील प्रत्येकी एक, फलटण कोव्हिड केअर केंद्रातील दोन, कराडच्या कृष्णा मेडिकल कॉलेजमधील आठ, पाचगणीतील बेल एअर हॉस्पिटल व खावली कोव्हिड केअर केंद्रातील प्रत्येकी सहा, असे एकूण 25 रुग्ण करोनामुक्त झाल्याने त्यांना सोमवारी घरी सोडण्यात आले, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
कृष्णा हॉस्पिटलमध्ये उपचार घेतलेल्या वडगाव-उंब्रज, ता. कराड येथील 86 वर्षांचा पुरुष, पाल येथील 55 वर्षांचा पुरुष, तुळसण येथील 51, 50 व 40 वर्षे वयाचे पुरुष, केसे येथील 64 वर्षांचा पुरुष, पाटण तालुक्यातील उरूल येथील 26 वर्षांचा युवक, जांभेकरवाडीतील 30 वर्षांचा युवक, अशा आठ जणांना करोनामुक्तीमुळे घरी सोडण्यात आले.
या करोनामुक्त रुग्णांचा पुष्पगुच्छ व प्रमाणपत्रे देण्यात आली. हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉ. ए. वाय. क्षीरसागर, त्वचारोग तज्ज्ञ डॉ. मोहन काळे, डॉ. बाळकृष्ण निकम, कामगार कल्याण अधिकारी अश्विनी शेटे, औषध विभागप्रमुख उत्तम जाधव, रश्मी कुलकर्णी, चंद्रकांत मोहिते, पर्यवेक्षक दिलीप काशीद, डॉ. संजय पाटील उपस्थित होते.
कृष्णा हॉस्पिटलमधील उपचारानंतर आतापर्यंत एकूण 214 रुग्णांनी करोनावर मात केली आहे. पाचगणीतील बेल एअर हॉस्पिटलमधून भणंग, ता. जावळी येथील 24 वर्षांची युवती व 21 वर्षांचा युवक, ओझरे येथील पाच वर्षांची बालिका, 25 वर्षांची महिला व 34 वर्षांचा, धोंडेवाडी येथील 65 वर्षांचा पुरुष, ब्रह्मपुरी येथील कोव्हिड केअर केंद्रातून साप, ता. कोरेगाव येथील 39 वर्षांचा पुरुष, वाई कोव्हिड केअर केंद्रातून बावधन नाका (वाई) येथील 25 वर्षांचा युवक, सातारा येथील जिल्हा रुग्णालयातून धोंडेवाडी, ता. जावळी येथील 57 वर्षांचा पुरुष, खावली कोव्हिड केअर केंद्रातून समर्थनगर, ता. सातारा येथील 19 वर्षांचा युवक, देगाव येथील 55 वर्षांचा पुरुष, शहापूर येथील 58 वर्षांचा पुरुष, कारंडवाडीतील 23 वर्षांची महिला व आठ वर्षांची मुलगी, सैदापूर येथील 37 वर्षांचा पुरुष, फलटण कोव्हिड केअर केंद्रातून वडले, ता. फलटण येथील 24 वर्षांचा युवक व 52 वर्षांचा पुरुष यांना घरी सोडण्यात आले.