वॉशिंग्टन : दक्षिण अमेरिकेत आलेल्या चक्रिवादळामुळे किमान 25 जण मरण पावले आहेत. असून बरेचजण जखमी झाले आहेत. या वादळामुळे घरांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. तसेच वीजपुरवठाही खंडीत झाला आहे.
या वावटळीमुळे अमेरिकेतल्या नॅश विले आणि सेंट्रल टेनिसी या भागात काल हे चक्रिवादळ आले होते. तसेच अनेक भागात वीज पुरवठा खंडित झाला आहे अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली. या आठवड्याच्या शेवटी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प चक्रिवादळाने प्रभावित झालेल्या या भागाचा दौरा करणार आहेत असेही या अधिकाऱ्यांनी सांगितले.
नॅशविलेच्या जॉन सी ट्यून विमानतळावर मोटारी एकमेकांवर उडून पडल्याचे दृश्य वृत्तवाहिन्यांच्या दृश्यामध्ये दिसले. या चक्रिवादळामुळे हॅंगर नष्ट झाले आणि डझनभर विमाने एकमेकांवर आदळली. टेनेसीमधून आलेल्या गंभीर वादळांमुळे इमारती, रस्ते, पूल आणि व्यवसायांचे मोठे नुकसान झाले, असे टेनेसी इमर्जन्सी मॅनेजमेंट एजन्सीने (टीईएमए) म्हटले आहे.