सातारा -सातारा जिल्ह्यातील विविध रुग्णालय व करोना केअर सेटरमधील 23 जण करोनामुक्त होऊन घरी गेले आहेत. त्यामुळे आजपर्यंत 223 जण करोनामुक्त झाले आहेत. रायगावच्या करोना केअर सेंटरमध्ये दाखल असणारे 4 जण करोनातून पूर्णपणे बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले. यामध्ये सातारा शहरातील प्रतापगंज पेठेतील 42 व 44 वर्षीय पुरुष, कोरेगांव तालुक्यातील कुमठे येथील 32 वर्षीय पुरुष व चंचळी येथील 29 वर्षीय पुरुष असे चार रुग्ण पूर्णपणे बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
त्याचप्रमाणे खावली येथील करोना केअर सेंटरमध्ये दाखल असणारे आठ जण आज करोनातून पूर्णपणे बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले. यामध्ये खटाव तालुक्यातील गादेवाडी येथील 1 पुरुष व 2 महिला, मांजरवाडी येथील 1 महिला, सातारा तालुक्यातील कुस खुर्द येथील 1 पुरुष व 2
महिला, कोरेगाव तालुक्यातील फलेवाडी येथील 1 महिला असे 8 करोनाबाधित रुग्ण पूर्णपणे बरे झाले असून त्यांना आज डिस्चार्ज देण्यात आला. कराडच्या कृष्णा मेडिकल कॉलेजमध्ये दाखल असणारे 11 जण आज करोनातून पूर्णपणे बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले. आजपर्यंत क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधासारण रुग्णालय, सह्याद्री हॉस्पिटल, जिल्ह्यातील करोना केअर सेंटर अशा विविध ठिकाणावरून आता पर्यंत 219 जण करोनामुक्त होऊन घरी गेले आहेत. कराड तालुक्यातील खालकरवाडी चरेंगाव येथील 25 वर्षीय युवक, इंदोली येथील 37 वर्षीय महिला, 12 व 14 वर्षीय मुली, म्हासोली येथील 55, 30, 55 वर्षीय महिला व 9 वर्षीय मुलगा, पाटण तालुक्यातील शिराळ येथील 25 वर्षीय युवक, खाले येथील 21 वर्षीय महिला, बनपुरी येथील 16 वर्षीय युवक असे 11 करोनाबाधित रुग्ण पूर्णपणे बरे झाले असून त्यांना आज डिस्चार्ज देण्यात आला.
आतापर्यंत कृष्णा हॉस्पिटलमधून आतापर्यंत 111 करोनामुक्त रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. या करोनामुक्त रुग्णांना मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ व प्रमाणपत्रे देण्यात आली. कृष्णा हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉ. ए. वाय. क्षीरसागर, कृष्णा अभिमत विद्यापीठाच्या परीक्षा नियंत्रक डॉ. रजनी गावकर, अतिरिक्त संशोधन संचालक डॉ. डी. के. अगरवाल, सहाय्यक कुलसचिव एस. ए. माशाळकर, प्राचार्या डॉ. वैशाली मोहिते, डॉ. संजय पाटील, डॉ. एस. आर. पाटील, रोहिणी बाबर, नीलम पाटील व कर्मचारी उपस्थित होते.
दरम्यान, क्रांतीसिंह नाना पाटील जिल्हा सर्वसाधारण रुग्णालयातील 25, कराडच्या वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयातील 52 व कृष्णा मेडिकल कॉलेजमधील 58, वाईच्या ग्रामीण रुग्णालयातील 7, खंडाळा येथील 33 व कोरेगांव येथील 9 अशा एकूण 184 जणांच्या घशातील स्त्रावांचे नमुने पुण्याच्या एन. सी. सी. एम. व कृष्णा हॉस्पिटलकडे पाठविण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.