करोनाग्रस्तांची एकूण संख्या 59 हजार 492 सातारा (प्रतिनिधी) – जिल्ह्यात काल गुरुवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 224 जणांचे अहवाल करोनाबाधित आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील करोनाग्रस्तांची एकूण संख्या 59 हजार 492 झाली आहे. तर एका बाधिताचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली. एका बाधिताचा मृत्यू जिल्ह्यातील खासगी हॉस्पिटलमध्ये (विहापूर ता. कडेगाव जि. सांगली) येथील 63 वर्षीय पुरुषाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याचेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे. एकूण नमुने -351521 एकूण बाधित -59492 घरी सोडण्यात आलेले -55951 मृत्यू -1860 उपचारार्थ रुग्ण-1681