प्रभात वृत्तसेवा सासवड – (स्व) शिवाजी पोमन यांच्या निधनानंतर राहुल गिरमे यांनी रक्तदानाचे काम कायमस्वरूपी पुढे चालू ठेवले आहे, हे अतिशय उत्कृष्ट असून रक्तदानासारखे जे दान आहे ते अमूल्य दान आहे. ते अविरतपणे सुरू राहणे गरजेचे आहे. रक्त हे नाती रंग वर्ण न पाहता जीवदान देत असते. नोबेल हॉस्पिटलच्या वतीने अमूल्य दान ही संकल्पना राबवण्यात आली. त्याच्यासोबतच सर्व शासकीय रुग्णालय सध्या अवयवादानाकडे गुंतलेले आहेत.रक्तदानासोबतच अवयवादानाची संकल्पना राबवणे गरजेचे असल्याचे नोबेल हॉस्पिटलच्या संचालक मंगेश लिंगायत यांनी सांगितले.सासवड (ता. पुरंदर) येथे (स्व)शिवाजीआप्पा पोमण मित्र परिवार पुरंदर हवेली यांच्या वतीने पद्मविभूषण शरदचंद्र पवार यांचे वाढदिवसाच्या निमित्ताने शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उदघाटन नोबल हॉस्पिटलचे संचालक डॉ. मंगेश लिंगायत यांच्या हस्ते व पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकचे चेअरमन दिगंबर दुर्गाडे, जालिंदर कामठे, शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विजय कोलते यांच्या उपस्थितीत झाले. गेल्या २२ वर्षे रक्तदान शिबिराचे आयोजन केले जाते आहे. शिवाजी पोमण यांच्या नंतर हा उपक्रम पुरंदर हवेली विधानसभा मतदार संघांचे अध्यक्ष, राहुल गिरमे यांनी सातत्याने न खंड पाडता गेली ५ वर्षे मित्र परिवाराच्या वतीने सुरु ठेवलेला आहे, असे नोबल हॉस्पिटलचे संचालक डॉ मंगेश लिंगायत यांनी सांगितले.यावेळी माजी आमदार संजय जगताप, सुदामराव इंगळे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष माणिकराव झेंडे, बबूसाहेब माहूरकर, वामन कामठे, विजय वढणे, रोहिदास कुंभार, जयदीप बारभाई, पंकज धिवार आदी उपस्थित होते. ईश्वर बागमार, शिवाजी साळुंखे, धोंडिबा कटके, विनोद जगताप, सचिन वारघडे, संजय टिळेकर, मनोहर जगताप, अरुण खेनट, रामभाऊ झेंडे, गणेश मोरे, मिलिंद जाधव, नवनाथ बोरावके, दत्ता राऊत यांनी रक्तदान शिबिराचे संयोजन केले. दोन दशकांहून अधिक मोठी चळवळ यावेळी २५६ रक्तदात्यांनी रक्तदान केले. गेली २२ वर्षे रक्तदानाची चळवळ सातत्य राबविण्यात येत असल्याचे शरद पवार राष्ट्रवादीचे पक्षाचे पुरंदर-हवेली विधानसभा मतदार संघांचे अध्यक्ष राहुल दिलीप गिरमे यांनी सांगितले.