जिल्हा परिषदेच्या 215 कर्मचाऱ्यांना बढती

38 आरोग्य महिला सहायक, 25 पुरुष आरोग्य सहायक यांचा समावेश

पुणे -जिल्हा परिषद सेवेतील 215 कर्मचाऱ्यांना बढती देऊन तत्काळ समुपदेशन पद्धतीने नेमणुका देण्यात आल्या आहेत. पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या संख्येने कर्मचाऱ्यांना बढत्या मिळाल्या असून, त्यामुळे

38 आरोग्य महिला सहायक आणि 25 पुरुष आरोग्य सहायक यांचा समावेश आहे.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी पदोन्नतीसाठी पात्र असणाऱ्या सर्व संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या बढत्या करण्यासंदर्भात विभाग प्रमुख यांना आदेश दिले होते. त्यानुसार गेल्या पंधरा दिवसांत पात्र कर्मचाऱ्यांचे धडक यांचे प्रस्ताव प्रशासनाकडून सादर करण्यात आले. त्यानंतर ही प्रक्रिया पार पडल्याचे सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले यांनी दिली.

ग्रामपंचायत विभागातील 21 ग्रामसेवकांना ग्रामविकास अधिकारीपदी बढती मिळाली. त्यामध्ये दोन दिव्यांगांचा समावेश आहे. तर, शिक्षण विभागातील 25 केंद्रप्रमुख यांना विस्तार अधिकारीपदी बढती दिली आहे. त्याचबरोबर वित्त विभागातील दहा कनिष्ठ लेखा अधिकारी, चार सहायक लेखाधिकारी, सामान्य प्रशासन विभागातील एक कक्ष अधिकारी, पाच अधीक्षक आणि दहा वरिष्ठ सहायक लिपिक यांना बढती मिळाली आहे.

लघुपाटबंधारे विभागामध्ये कनिष्ठ आरेखक तीन आणि एक मुख्य आरेखक बढतीसाठी पात्र ठरले आहेत. बांधकाम विभागात तीन कनिष्ठ अभियंता यांना बढती मिळाली. आरोग्य विभागामध्ये पाच आरोग्य पुरुष पर्यवेक्षक, दोन महिला पर्यवेक्षक, 25 आरोग्य सहायक पुरुष आणि 38 आरोग्य सहायक महिला यांचा बढती मिळालेल्या मध्ये समावेश आहे. पशुसंवर्धन विभागातील बढतीमध्ये एकूण 58 जणांचा समावेश आहे. बढती मिळाल्यानंतर देण्यात आलेल्या नेमणुकांचा ठिकाणी हे कर्मचारी रुजू झाले आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.