२१ लाख शेतकऱ्यांना भाजप पक्षाशी जोडणार; २ सप्टेंबरपासून अभियानाची सुरूवात

नवी दिल्ली – भारतीय जनता पार्टी आपल्या सदस्य नोंदणी मोहीमेच्या तयारीत जुंपली आहे. पक्षाने यावेळी असे ठरवले आहे की त्यांच्या किसान मोर्चाद्वारे २१ लाख शेतकऱ्यांना पक्षाशी जोडून घ्यायचे आहे. किसान मोर्चाच्या नेत्यांनी शेतकऱ्यांशी थेट संपर्क साधावा आणि त्यांना पक्षाची धोरणे, विचारधारा, पक्षाने शेतकऱ्यांसाठी केलेल्या कामांची माहिती देत त्यांनी पक्षाशी जोडून घ्यावे असे निर्देश देण्यात आले आहेत.
शेतकऱ्यांमध्ये आपली उपस्थिती वाढवाव यासाठी भाजपने असा निर्णय घेतला आहे की उत्तर प्रदेशातील जे१९१८ मंडल आहेत त्यात प्रत्येकी ११००- ११०० सदस्य जोडून घेतले जावेत. किसान मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांच्या कार्यशाळेत शेतकऱ्यांशी थेट संपर्क वाढवण्याच्याही सूचना देण्यात आल्या आहेत.
भाजपचे उत्तर प्रदेश अध्यक्ष भूपेंद्र चौधरी म्हणाले की आम्ही लोकांना केवळ पक्षाचे सदस्य करत नाही तर त्यांना पक्षाच्या विचारधारेशीही जोडून घेतो. विचारधारा आणि धोरणे याद्वारे समाजातील सर्व घटकांना पक्षाशी जोडून घेण्याचा आमचा प्रयत्न असतो. २ सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांना प्रथम सदस्य बनवून अभियानाची सुरूवात केली जाणार आहे.
त्याच दिवशी भाजपचे सगळे ज्येष्ठ नेते ७५ लाख प्राथमिक सदस्य नोंदणीचा संकल्प पूर्ण करतील. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनाही प्रदेशाध्यक्ष चौधरी यांच्या माध्यमातून ३ सप्टेंबर रोजी सदस्यता दिली जाणार आहे. उत्तर प्रदेशात भाजपने खासदार, आमदार, महापौर, नगरसेवक अशा सगळ्यांनाच पक्षाचे नवे सदस्य जोडण्याचे टार्गेट दिले आहे.





