2026 Mega Releases: शाहरुख खान, यश, सलमान खान, रणबीर कपूर यांसारखे सुपरस्टार्स आपल्या मोठ्या बजेटच्या चित्रपटांसह 2026 मध्ये प्रेक्षकांना जबरदस्त मनोरंजन देण्यासाठी सज्ज आहेत. पुढील वर्षी अनेक मोठ्या आणि चर्चेत असलेल्या चित्रपटांची रिलीज लाइनअप तयार झाली आहे. शाहरुखचा ‘किंग’ आणि यशचा ‘टॉक्सिक’ शाहरुख खान आपल्या अॅक्शन फिल्म ‘किंग’ मधून पुन्हा धमाकेदार एन्ट्री करत आहे. सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित हा चित्रपट सुमारे 350 कोटी खर्चून तयार होत आहे. यात दीपिका पदुकोण, अभिषेक बच्चन, राणी मुखर्जी आणि सुहाना खान दिसणार आहेत. ‘KGF’ नंतर चार वर्षांनी यश ‘टॉक्सिक’ या चित्रपटातून परत येत आहे. गीतू मोहनदास दिग्दर्शित ही फिल्म 200 कोटीच्या बजेटमध्ये 19 मार्च 2026 रोजी रिलीज होणार आहे. यात टोविनो थॉमस, नयनतारा आणि कियारा अडवाणी यांचीही भूमिका आहे. सलमानचा ‘बैटल ऑफ गलवान’ आणि भंसालींची ‘लव्ह अँड वॉर’ सलमान खान 2020 मधील भारत-चीन गलवान संघर्षावर आधारित ‘बैटल ऑफ गलवान’ मध्ये आर्मी ऑफिसरच्या भूमिकेत दिसणार आहेत. अपूर्व लेखिया दिग्दर्शित हा सुमारे 100 कोटीचा प्रकल्प असून तो एखाद्या राष्ट्रीय दिनी रिलीज केला जाऊ शकतो. संजय लीला भंसालींचा भव्य चित्रपट ‘लव्ह अँड वॉर’ देखील 2026 मध्ये येणार आहे. रणबीर कपूर, आलिया भट्ट आणि विक्की कौशल हे तिघे पहिल्यांदाच एकत्र काम करत आहे. या पीरियड प्रेमकथेला 200 कोटींचा बजेट असून ती वर्षाच्या शेवटी येणार आहे. भारताची सर्वात महागडी फिल्म – ‘रामायण: पार्ट 1’ 2026 मधील सर्वात मोठी आणि चर्चेत असलेली फिल्म म्हणजे नितेश तिवारी दिग्दर्शित ‘रामायण: पार्ट 1’. असं सांगण्यात येतंय की, जवळपास 4000 कोटी खर्चून तयार होणारा हा भारतीय सिनेमा इतिहासातील सर्वात महागडा प्रकल्प मानला जात आहे. मुख्य कलाकार: रणबीर कपूर – भगवान राम साई पल्लवी – माता सीता यश – रावण सनी देओल – हनुमान रवि दुबे – लक्ष्मण या महाकाव्याचा पहिला भाग दिवाळी 2026, तर दुसरा भाग 2027 मध्ये रिलीज होणार आहे. ही फिल्म बॉक्स ऑफिसचे नवे रेकॉर्ड तोडू शकते, अशी अपेक्षा आहे.