बाजारात आली नवीकोरी Honda Activa, किंमत तुमच्या बजेटमध्ये; जाणून घ्या सविस्तर

2025 Honda Activa 110 Launched: होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडियाने नवीन वर्षात 2025 Honda Activa 110 ला लाँच केले आहे. कंपनीने Honda Activa मध्ये अनेक नवीन फीचर्स दिले आहेत. ही कंपनीची सर्वाधिक विक्री होणारी स्कूटर असून कंपनीने नवीन मॉडेलमध्ये अनेक बदल केले आहेत.
2025 Honda Activa 110 ची किंमत
कंपनीने नवीन Honda Activa 110 ला स्टँडर्ड, डिलक्स आणि एच-स्मार्ट या तीन व्हेरिएंट्समध्ये लाँच केले आहे. या स्कूटरची सुरुवाती किंमत 80,950 रुपये (एक्स-शोरूम) आहे. हे Activa 6G मॉडेल असून, मागील मॉडेलच्या तुलनेत नवीन होंडा अॅक्टिव्हाची किंमत 2,300 रुपये जास्त आहे.
2025 Honda Activa 110 चे स्पेसिफिकेशन्स
नवीन 2025 Honda Activa 110 मध्ये डिझाइन व लूकच्याबाबतीत फारसा बदल करण्यात आलेला नाही. हे काही प्रमाणात जुन्या मॉडेल सारखेच आहे. ग्राहक नवीन होंडा अॅक्टिव्हाला पर्ल साइरन ब्लू, पर्ल प्रेशियस व्हाइट, पर्ल इग्नियस ब्लॅक, डिसेंट ब्लू मेटॅलिक, मॅट अॅक्सिस ग्रे आणि रेबेल रेड मेटॅलिक रंगात खरेदी करू शकतात.
कंपनीने या नवीन स्कूटरला अपडेटेड 109 सीसी क्षमतेच्या सिंगल सिलेंडर इंजिनसह लाँच केले असून, हे 7.8 hp पॉवर आणि 9.05 Nm टॉर्क जनरेट करते. तसेच, अधिक माइलेज मिळावे यासाठी कंपनीने यात आइडलिंग स्टॉप सिस्टम देखील दिले आहे.
या मॉडेलमध्ये कंपनीने काही नवीन फीचर्स देखील दिले आहेत. यात 4.2 इंच टीएफटी डिस्प्ले देण्यात आला असून, यामध्ये ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीची सुविधा मिळते. याद्वारे वाहन चालवताना नेव्हिगेशन, कॉल नॉटिफिकेशन सारख्या सुविधा मिळतील. याशिवाय, यामध्ये यूएसबी टाइप-सी चार्जरचा पर्याय देखील देण्यात आला आहे.
Honda Activa ही भारतीय बाजारातील सर्वाधिक विक्री होणाऱ्या स्कूटर्सपैकी एक आहे. आता नवीन मॉडेल बाजारात TVS Jupiter ला टक्कर देईल. टीव्हीएस ज्युपिटरची किंमत 76,691 रुपये ते 87,791 रुपयांपर्यंत (एक्स-शोरूम) आहे.


