2002 Gujarat Riots Case : तिस्ता सेटलवाड यांचा न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला अन् तत्काळ…

अहमदाबाद :- गुजरात उच्च न्यायालयाने आज सामाजिक कार्यकर्त्या तीस्ता सेटलवाड यांचा नियमित जामीन अर्ज फेटाळून लावला आणि 2002 च्या गोध्रा दंगलीनंतरच्या प्रकरणांमध्ये निरपराध लोकांना फसवण्याच्या बनावट पुराव्याशी संबंधित प्रकरणात त्वरित शरण येण्याचा आदेश दिला आहे.
तिस्ता सेटलवाड या सध्या अंतरीम जामीनावर बाहेर आहेत. आता त्यांचा जामीन अर्ज नाकारण्यात आल्याने त्यांना पुन्हा कारागृहात जावे लागणार आहे.
सेटलवाड आणि सहआरोपी माजी पोलीस महासंचालक आर बी श्रीकुमार यांना गेल्या वर्षी 25 जून रोजी गुजरात पोलिसांनी ताब्यात घेतले होते आणि त्यांची पोलीस कोठडी संपल्यानंतर न्यायालयाने त्यांना 2 जुलै रोजी न्यायालयीन कोठडीत पाठवले होते.
पण सर्वोच्च न्यायालयाने दिलासा दिल्यानंतर सप्टेंबर 2022 त्या तुरूंगातून बाहेर आल्या होत्या. सेटलवाड आणि इतर दोघांवर भारतीय दंडविधानाच्या विविध कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.





