Nagar | ४७ लाखांचा २०० किलो गांजा पकडला

नगर, (प्रतिनिधी) – आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने भिंगार कँम्प पोलीस ठाणे हद्दीत ४७ लाख ९२ हजार ८०० रुपयांचा २०० किलो गांजा, तसेच दोन मोबाईल, १५ लाख रुपयांच्या ट्म्पो असा एकूण ६३ लाख २२ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. याबात तिघांना ताब्यात घेतले असून भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संतोष वसंत पठाडे, (वय 35, रा.सम्राट नगर, वडगाव गुप्ता, एमआयडीसी, अहिल्यानगर), अक्षय सुर्यकांत भांड, (रा.कोल्हार, ता.राहुरी, जि.अहिल्यानगर), सतीष अंकुश काळे, (वय 32, रा.सालसे, ता.करमाळा, जि.सोलापूर), असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना मिळालेल्या माहितीनुसार जामखेड येथून एका ट्रक मध्ये २०० किलो गांजाची अवैध वाहतूक केली जात असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार गुन्हे शाखेच्या पथकाने भिंगार कॅम्प पोलीस ठाणे हद्दीत जामखेड ते अहिल्यानगर रोडवरील एमआयआरसी, हत्ती बारव येथे सापळा रचवून क्र,एमएच-02-ईआर-4045) यावाहनास ताब्यात घेतले.
टेम्पोची पंचासमक्ष झडती घेतली असता संतोष वसंत पठाडे याचेकडून 30 रुपये किंमतीचे दोन मोबाईल व टेम्पोमधुन 47 लाख 92 हजार 800 रुपये किमतीचा १९९. ७०० कि.ग्रॅ. वजनाचा अंमली पदार्थ गांजा ताब्यात घेतला. याबाबत भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा तिघाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास भिंगार पोलीस करत आहेत.
ही कारवाई गुन्हे शाखेचे पोसई तुषार धाकराव व पोलीस अंमलदार संतोष लोढे, अतुल लोटके, फुरकान शेख, संतोष खैरे, शिवाजी ढाकणे, प्रशांत राठोड, अरूण मोरे, विजय ठोंबरे, रोहित मिसाळ, मेघराज कोल्हे, तसेच भिंगार कॅम्प पोलिसांनी केली.





