नैरोबी : टांझानियामध्ये, काल संध्याकाळी उत्तरेकडील ओपन-एअर इव्हॅन्जेलिकल ख्रिश्चन चर्चमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये कमीतकमी 20 जणांचा मृत्यू झाला. मृतांची संख्या आणखी वाढू शकते अशी भीती उत्तरेकडील मोशी येथील जिल्हा आयुक्त किप्पी वारीओबा यांनी व्यक्त केली आहे.
लोकप्रिय उपदेशक आणि टांझानियातील अराईजेस आणि शाइन मंत्रालयाचे प्रमुख बोनीफास म्वाम्पोसा यांच्या नेतृत्वात असलेल्या प्रार्थना समारंभात उपासकांचा जमाव प्रार्थना करत होता, तेंव्हा ही दुर्घटना घडली.
म्वाम्पोसा यांनी जेव्हा स्वत: ला प्रेषित म्हणवून घेतले, तेंव्हा चेंगराचेंगरी झाली. त्यानी पवित्र जल म्हणून सांगितलेले पाणी जमिनीवर ओतले व आजार बरे होण्याच्या आशेने लोकांनी त्याला स्पर्श करण्यासाठी एकच झुंबड उडाली. त्या चेंगराचेंगरीमध्ये डझनभर लोक ताबडतोब गोंधळलेले आणि पायदळी तुडवके गेले.