मुंबई – मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी रेल्वे कर्मचाऱ्यांनी आज गर्दीच्या वेळी सायंकाळी आंदोलन केले. या आंदोलनाचा फटका ठाणे रेल्वे स्थानकातील प्रवाशांना बसला असून 20 मिनिटांपासून ट्रेन दादरला थांबून आहेत. त्यामुळे मुलुंड आणि ठाणे रेल्वे स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी आहे. गर्दीमुळे चार प्रवासी लोकल ट्रॅकवरुन जात असताना लोकलची धडक बसल्याने खाली पडल्याची धक्कादायक घटना घडली असून दोघांचा मृत्यू झाला आहे. ट्रेनमधून खाली पडलेल्या प्रवाशांना जे.जे. रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मस्जिद आणि सीएसएमटी रेल्वे मार्गावर सँडहर्स्ट रोडजवळ हा अपघात झाला. ट्रॅकवरुन प्रवासी चालत होते, 3 पुरुष आणि 1 महिला ट्रॅकवरुन चालत असताना अचानक लोकल मागून आली, त्यात त्यांना धडक बसली. अंबरनाथला जाणारी लोकल ट्रेन होती, अशी माहिती आहे.