#Video : चोरांची शक्कल ! चालता-बोलता सव्वा दोन लाख रूपये पळविले….थरार कॅमेऱ्यात कैद

Updated On:
#Video : चोरांची शक्कल ! चालता-बोलता सव्वा दोन लाख रूपये पळविले….थरार कॅमेऱ्यात कैद

इंदापूर  – तुमचे पैसे रस्त्यावर पडल्याचे सांगत दोन अनोळखी इसमांनी एका दुचाकीस्वाराच्या गाडीला लावलेल्या पिशवितील रोख रक्कम 2 लाख 33 हजार रूपये दिवसाढवळ्या लंपास केल्याची घटना पुणे जिल्ह्यातील इंदापूर शहरात घडलीय.विकास मानसिंग भोसले (रा. डाळज नं.1, तालुका इंदापूर, जि.पुणे) यांनी इंदापूर पोलीस ठाण्यात फीर्याद दिली आहे.

सविस्तर घटना अशी की, विकास भोसले हे इंदापूर शहरातील आपल्या दुचाकीवरून निघाले होते. दरम्यान दोन दुचाकीवरून अनोळखी दोन इसमानी रस्त्यावर 10 रूपयाच्या तीन नोटा टाकल्या आणि तुमचे पैसे रस्त्यावर पडले आहेत असे भोसले यांना सांगीतले.

त्यावर भोसले यांनी लागलीच दुचाकी मोटार सायकल रस्त्यातच उभी केली आणि ते रस्त्यात पडलेले पैसे गोळा करण्यासाठी गेले. याच दरम्यान दोन अनोळखी मोटार दुचाकीवरुन आलेल्या इसमांनी भोसले यांच्या दुचाकीच्या हँन्डल ला अडकवलेली पैशाची पिशवी घेवुन धूम ठोकली. यावेळी भोसले यांनी आरडाओरडा केली मात्र चोरांनी पैशांची पिशवी घेऊन लंपास झाले.

याबाबतीत इंदापूर पोलिस आता या चोरांचा शोध घेत असून त्यासाठी तीन पोलीसांची टीम रवाना करण्यात आल्याची माहिती इंदापूरचे पोलीस निरीक्षक तय्यब मुजावर यांनी दिली आहे.

आणखी संबंधित बातम्या

Jairam Ramesh : सत्तेचा अहंकार आत्मघातकी असतो; जयराम रमेश यांची टीका

2026-10-04 16:39:28

Jairam Ramesh : सत्तेचा अहंकार आत्मघातकी असतो; जयराम रमेश यांची टीका

Sangli : खंडेराजुरीतील घरफोडीचा गुन्हा उघड

2026-09-28 21:26:47

Sangli : खंडेराजुरीतील घरफोडीचा गुन्हा उघड

Latur Police : लातूरमध्ये विनाहेल्मेट दुचाकी चालवणाऱ्या ५८ पोलीसांना दंड

2026-08-30 18:07:24

Latur Police : लातूरमध्ये विनाहेल्मेट दुचाकी चालवणाऱ्या ५८ पोलीसांना दंड

Pimpri News: जुलै महिन्‍यात वाहन खरेदी सुसाट! दुचाकी, कार आणि व्यावसायिक वाहनांच्या नोंदणीत मोठी वाढ

2026-08-27 09:29:02

Pimpri News: जुलै महिन्‍यात वाहन खरेदी सुसाट! दुचाकी, कार आणि व्यावसायिक वाहनांच्या नोंदणीत मोठी वाढ

Shirur Crime : भरदिवसा शोरूममधून ई-स्कूटी लंपास; सीसीटीव्हीच्या आधारे चोरटा पोलिसांच्या जाळ्यात

2026-08-25 18:55:37

Shirur Crime : भरदिवसा शोरूममधून ई-स्कूटी लंपास; सीसीटीव्हीच्या आधारे चोरटा पोलिसांच्या जाळ्यात