#CWG2022 #ParaTableTennis : पॅरा टेबल टेनिसमध्ये भाविनाला सुवर्ण तर सोनलबेनला ब्रॉंझपदक
Updated On:

बर्मिंगहॅम – भारताची दिग्गज महिला पॅरा टेबल टेनिसपटू भाविना पटेलने येथे सुरू असलेल्या पॅरा राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदकाला गवसणी घातली. तसेच याच क्रीडा प्रकारात भारताची आणखी एस अव्वल खेळाडू सोनलबेन पटेलला मात्र ब्रॉंझपदकावर समाधान मानावे लागले.
भाविनाने अंतिम सामन्यात नायजेरियाच्या फेशुकुड क्रिस्टीनाचा 12-10, 11-2, 11-9 असा सरळ तीन गेममध्ये पराभव केला. यापूर्वी भाविनाने उपांत्य फेरीत इंग्लंडच्या सू बेलीचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश मिळवत पदक निश्चित केले होते.
भारताच्या सोनल बेन पटेलने इंग्लंडच्या सू बेलीचा 11-5, 11-2, 11-3 असा पराभव केला. गेल्या वर्षी झालेल्या टोकियो पॅरालिम्पिकमध्ये तिने रजतपदक मिळवत आपले वर्चस्व सिद्ध केले होते.





