किसान सन्मान निधीचा 19 वा हप्ता कधी येणार?, केंद्रीय कृषिमंत्र्यांनी सांगितली तारीख

19th installment of Kisan Samman Nidhi – देशभरातील शेतकरी ज्या तारखेची वाट पाहत होते ती तारीख अखेर आली आहे. केंद्र सरकारने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM-Kisan Nidhi) चा नवीन हप्ता जाहीर केला आहे. हा हप्ता 24 फेब्रुवारी रोजी शेतकऱ्यांना दिला जाणार आहे. केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी शुक्रवारी ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी किसान सन्मान निधीची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हस्तांतरित केली जाईल. केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी त्यांच्या एक्स हँडलवर यासंदर्भात माहिती दिली आहे.
पीएम-किसान योजनेंतर्गत, प्रत्येक लाभार्थी शेतकऱ्याला 6,000 रुपये दिले जातात. या योजनेचा लाभ शेतकऱ्यांना दर चार महिन्यांनी तीन समान हप्त्यांमध्ये दिला जातो. शेतकऱ्यांच्या खात्यावर 2 हजार रुपये जमा केले जातात.
केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी किसान सन्मान निधीबाबत ट्विट केले आहे. ते म्हणाले की, पंतप्रधान 24 फेब्रुवारी रोजी भागलपूर, बिहार येथे पीएम-किसान योजनेचा 19 वा हप्ता जारी करतील. ही रक्कम पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा केली जाईल.
शिवराज सिंह चौहान यांचे ट्विट:
आदरणीय पंतप्रधान श्री @narendramodi जी 24 फेब्रुवारी रोजी बिहारमधील भागलपूर येथून सुमारे 9 कोटी 80 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात पंतप्रधान किसान सन्मान निधीचा 19 वा हप्ता म्हणून 22 हजार कोटी रुपयांची रक्कम हस्तांतरित करतील.
आदरणीय प्रधानमंत्री श्री @narendramodi जी 24 फरवरी को बिहार के भागलपुर से लगभग 9 करोड़ 80 लाख किसानों के खाते में प्रधानमंत्री किसान सम्मान निधि की 19वीं किस्त के रूप में 22 हजार करोड़ रुपए की राशि अंतरित करेंगे। pic.twitter.com/PAMjMxEDrs
— Shivraj Singh Chouhan (@ChouhanShivraj) February 21, 2025




