कराड – उंब्रज येथील रहिवासी असणाऱ्या 29 वर्षीय महिला पोलिस अधिकाऱ्याने करोनावर यशस्वी मात केली. त्यांच्यासह करोनावर मात करणाऱ्या पाच जणांना गुरूवारी कृष्णा हॉस्पिटलमधून टाळ्यांच्या गजरात डिस्चार्ज देण्यात आला. उंब्रज येथील 29 वर्षीय महिला मुंबई येथे पोलीस दलात अधिकारी म्हणून कार्यरत आहे. सेवेत असतानाच त्यांना करोनाची लागण झाली. त्यांना उपचारासाठी कराडच्या कृष्णा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. यशस्वी उपचाराने त्यांनी करोनावर मात केली. त्यांच्यासह वानरवाडी येथील 25 वर्षीय युवक, 25 वर्षीय महिला, पाटण तालुक्यातील सदुवर्पेवाडी-सळवे येथील 30 वर्षीय महिला आणि नवारस्ता येथील 12 वर्षीय मुलगी अशा एकूण पाच जणांना गुरूवारी कृष्णा हॉस्पिटलमधून टाळ्यांच्या गजरात डिस्चार्ज देण्यात आला. यावेळी पोलीस उपनिरीक्षक दीपज्योती पाटील, सहाय्यक पोलिस निरीक्षक शुभांगी जमदाडे, कृष्णा अभिमत विद्यापीठातील भक्ती जोशी, मेघा पाटील, गोपालकृष्ण जोशी, वरद जंबगी यांच्या करोनाची बाधा झाल्यावर सर्वांनाच मोठा मानसिक धक्का बसतो. मलाही करोनाची बाधा झाली तेव्हा अशाच मानसिक अवस्थेतून जावे लागले. पण कृष्णा हॉस्पिटलमधील सर्वच डॉक्टर्स व अन्य स्टाफने दिलेल्या आधारामुळे, घेतलेल्या विशेष काळजीमुळे माझ्यासह अनेकजण करोनावर मात करून बरे होऊ शकले. करोनामुक्त महिला पोलिस अधिकारी