Delhi News – दिल्ली सरकारने राजधानीतील रेशनकार्डधारक कुटुंबांसाठी आणि महिलांसाठी दिलासादायक घोषणा केली आहे. होळी आणि दिवाळी या दोन प्रमुख सणांसाठी मोफत एलपीजी सिलिंडर देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला असून, यासाठी २४२ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या योजनेअंतर्गत प्रत्येक पात्र रेशनकार्डधारकाच्या खात्यात ८५३ रुपये थेट लाभ हस्तांतरण (डीबीटी) पद्धतीने जमा केले जाणार आहेत. विशेष म्हणजे, पाइपलाइन गॅस (पीएनजी) वापरणाऱ्या कुटुंबांनाही या निर्णयाचा लाभ मिळणार आहे. मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी ही घोषणा करताना सांगितले की, हा निर्णय भाजपच्या दिल्ली विधानसभा निवडणूक जाहीरनाम्यात दिलेल्या आश्वासनांचा भाग आहे. महागाईच्या काळात सणासुदीच्या वेळी घरगुती बजेटवरचा ताण कमी करणे, हे आमचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी बोलताना स्पष्ट केले. Free cylinders राजकीय दृष्टिकोनातून पाहिले असता, भाजपने आपल्या जाहीरनाम्यात महिला सशक्तीकरण, गरीब व मध्यमवर्गीय कुटुंबांना थेट आर्थिक मदत आणि जीवनावश्यक सुविधांमध्ये सवलत यांवर विशेष भर दिला होता. मोफत एलपीजी सिलिंडरची घोषणा ही त्या धोरणाची अंमलबजावणी मानली जात आहे. हे नक्की वाचा : Sunetra Pawar : सुनेत्रा पवारांना मोदी-शहांनी दिल्लीला बोलावलं; राजधानीत हालचालींना वेग आम आदमी पक्षाच्या ‘मोफत योजनां’च्या राजकारणाला प्रत्युत्तर देताना भाजप आता थेट लाभ आणि आर्थिक शिस्त या मुद्द्यांवर आपली वेगळी ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचेही दिसून आले आहे. दिल्लीतील कुटुंबांसाठी हा निर्णय सणांचा आनंद द्विगुणित करणारा ठरणार आहे. ही बातमी वाचा : Job vacancy : कामाची बातमी..! १० वी पास तरुणांना मिळणार सरकारी नोकरी; असा करा अर्ज, पगार सुद्धा दमदार !