प्रभात वृत्तसेवा लोणी काळभोर – कदमवाकवस्ती (ता. हवेली) येथील संभाजीनगर परिसरात दहावी उत्तीर्ण झालेल्या एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना गुरुवारी (31 जुलै) रात्री आठच्या सुमारास घडली.मृत मुलीचे नाव रोशनी संतोष पसरडे (वय 17, रा. गणेश कॉम्प्लेक्स, युनियन बँकेजवळ, कदमवाकवस्ती) असे असून, ती आपल्या कुटुंबासोबत तेथे वास्तव्यास होती.मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, रोशनी दहावी परीक्षा उत्तीर्ण झाली होती. तिच्या इच्छेनुसार विवाह निश्चित झाला होता आणि साखरपुडा देखील पार पडलेला होता. गुरुवारी रात्री ती खोलीत गेल्यानंतर बराच वेळ बाहेर न आल्याने नातेवाईकांनी शोध घेतला असता, ती साडीच्या सहाय्याने फॅनला लटकलेल्या अवस्थेत आढळून आली. ही बाब लक्षात येताच तातडीने लोणी काळभोर पोलिसांना माहिती देण्यात आली.पोलीस उपनिरीक्षक योगेश पैठणे, पोलिस हवालदार राणी खामकर, केतन धेंडे, पोलिस अंमलदार रूपाली कदम व इतर कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तातडीने रोशनीला खाली उतरवून उपचारासाठी लोणी काळभोर येथील सरकारी रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तिचा मृत्यू आधीच झाल्याचे जाहीर केले.