माझी लाडकी बहीण योजनेचे शुक्रवारपर्यंत १७ हजार अर्ज

नगर – माझी लाडकी बहीण योजनेचे जिल्ह्यात सुमारे ४ लाख ५० संभाव्य लाभार्थी असू शकतील. शुक्रवारपर्यंत १७ हजार ११८ लाभार्थ्यांचे अर्ज प्राप्त झाल्याची माहिती जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी दिली. जिल्ह्यात राबवल्या जाणार्या विविध योजना, मतदार यादीतील २१ ते ६५ वयोगटातील महिला, यानुसार ही संभाव्य लाभार्थ्यांची संख्या असू शकते, असा अंदाज असल्याचे त्यांनी सांगितले.
राज्य सरकारच्या महिला व बाल कल्याण विभागामार्फत ही योजना राबवली जात असली तरी जिल्हा महिला व बालकल्याण अधिकार्याचे नगरमधील पद रिक्त असल्याने जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बालकल्याण) मनोज ससे यांची या योजनेच्या अंमलबजावणीसाठी नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आल्याचे जिल्हाधिकार्यांनी सांगितले. योजनेच्या अंमलबजावणीसाठी राज्य सरकारने मनारी शक्ती दूत नावाचे मोबाईल तयार केले आहे. जिल्ह्यातील 6 हजार 650 अंगणवाडी व इतर कर्मचार्यांनी हे अॅप मोबाईलहमध्ये डाउनलोड केले आहे. या अॅपवर २ हजार ८६० नाव नोंदणी झाली आहे. याशिवाय प्रत्यक्ष स्वरूपात १४ हजार २६० अर्ज प्राप्त झाले आहेत. राज्य सरकारने योजनेचे अर्ज दाखल करण्यासाठी 31 ऑगस्ट ही अंतिम तारीख दिली असली तरी 15 जुलैपर्यंत जिल्ह्यात संभाव्य लाभार्थींची नावे संकलित केली जातील, असेही जिल्हाधिकार्यांनी स्पष्ट केले.





