महाराष्ट्रावर ‘शक्ती’ चक्रीवादळाचे संकट! ४ ते ७ ऑक्टोबर दरम्यान मुसळधार पावसाचा इशारा

Cyclone Shakti | महाराष्ट्रात पावसाने उघडीप घेतल्याचे चित्र असतानाच आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचे संकट निर्माण झाले आहे. भारतीय हवामान विभागाने महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना ‘शक्ती’ चक्रीवादळाचा इशारा दिला आहे. ४ ते ७ ऑक्टोबर दरम्यान मध्यम ते तीव्र चक्रीवादळासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
राज्यातील मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या किनारपट्टीवरील जिल्ह्यांवर शक्ती चक्री वादळाचा परिणाम होणार आहे. ज्याची तीव्रता सध्या कमी ते मध्यम स्तरावर असेल. साधारण ४५ ते ५५ किमी प्रतितास वेगाने वारे वाहतील आणि ताशी ६५ किमी पर्यंत सोसाट्याचे वारे येण्याची शक्यता आहे. तर वादळाच्या तीव्रतेनुसार वाऱ्याचा वेग वाढू शकतो.
उत्तर कोकणातील सखल भागांत पूर येण्याची शक्यता
याशिवाय पूर्व विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागांत मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. वातावरणात आर्द्रता आणि ढगांची तीव्र निर्मिती यामुळे उत्तर कोकणातील सखल भागांत पूर येण्याची शक्यता आहे. ‘शक्ती’ चक्रीवादळाच्या इशाऱ्याला प्रतिसाद म्हणून महाराष्ट्र सरकारने तयारीसाठी निर्देश जारी केले आहेत. Cyclone Shakti |
IMD issues cyclone ‘Shakti’ warning for Maharashtra; heavy rains expected from October 4-7
Read @ANI Story | https://t.co/18UdJF94Tc#cycloneshakti #IMD #Maharashtra pic.twitter.com/y3KkGRHr3S
— ANI Digital (@ani_digital) October 4, 2025
जिल्हा प्रशासनांनी त्यांची आपत्ती व्यवस्थापन प्रणाली सक्रिय करावी, किनारी आणि सखल भागांतील नागरिकांसाठी स्थलांतर योजना तयार करावी, सार्वजनिक सूचना जारी कराव्यात, सागरी प्रवासापासून दूर राहण्याचा सल्ला द्यावा आणि अतिवृष्टीदरम्यान सुरक्षितता राखण्याचे आवाहन केले आहे. तर मच्छिमारांना या कालावधीत समुद्रामध्ये न जाण्याच्या देखील सूचना देण्यात आल्या आहेत. Cyclone Shakti |
हेही वाचा:
Pune Crime : वाघोलीत भरवस्तीत दोन घरे फोडली! 13 तोळे सोनं आणि रोख रक्कम लंपास





