अहमदाबाद – गुजरातेत एका पोलिस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या जुगारी अड्ड्याच्या संबंधात कोणतीही माहिती नसल्याने किंवा ही माहिती असूनही निष्काळजीपणाने त्याकडे दुर्लक्ष करून कर्तव्यात कसुर केल्याने सोळा पोलिस कर्मचाऱ्यांना निलंबीत करण्यात आले आहे.
गुजरात पोलिसांच्या विषेश पोलिस पथकाने 6 जुलै रोजी या जुगारी अड्ड्यावर छापा टाकून तेथे शंभर जणांना अटक केली तसेच तेथे 11 लाख रूपयांची रोकडही जप्त करण्यात आली. हा अड्डा मनपसंद जिमखाना या नावाने चालवला जात होता. तसेच तेथे एका चॅरिटेबल ट्रस्टचे काम सुरू असल्याचेही दाखवले गेले होते. पण प्रत्यक्षात तेथे जुगार चालत होता.
स्थानिक पोलिसांच्या आशीर्वादाने हे काम सुरू असल्याचे सांगितले गेल्याने या 16 पोलिसांवर ही कारवाई करण्यात आली. कारवाई करण्यात आलेल्यांमध्ये त्या ठाण्याचा निरीक्षक, उपनिरीक्षक, डीबी स्टाफच्या अन्य 14 जणांचा समावेश आहे.