भिवंडीत 16 लाखांचा गांजा जप्त
Updated On:

ठाणे – फातमा नगर येथील एका घरातून पोलिसांनी तब्बल 16 लाख 37 हजार 480 रुपये किंमतीचा 75 किलो गांजा जप्त केला आहे. या प्रकरणी एकास आरोपीस अटक करण्यात आली आहे, अशी माहिती गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन गायकवाड यांनी दिली.
कमल हसन रजा उर्फ गुड्डू अन्सारी (वय 24 वर्षे) असे गांजा अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याने फातमा नगर येथे तो राहत असलेल्या घरातील खोलीत अवैध गांजा साठवला असल्याची खबर भिवंडी गुन्हे शाखा युनिट-2 यांना मिळाली.
गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने फातमा नगर, मैदानाच्या बाजूला छापा मारून कमल याचे राहत्या घरातून एकुण वजन 74.624 किग्रॅ वजनाचा गांजा, रोख रक्कम व मोबाईल फोन असा एकूण 16 लाख 37 हजार 480 रुपयांचा मुद्देमाल गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जप्त केला.



