हमालाच्या कुटूंबियांना 16 लाख 90 हजार नुकसानभरपाई

पुणे – समोरून आलेल्या दुचाकीने धडक दिल्यामुळे दुचाकीस्वार हमालाचा मृत्यू झाल्याप्रकरणात, त्यांच्या कुटुबियांना 16 लाख 90 हजार रुपयांची नुकसानभरपाई देण्याचा आदेश मोटार अपघात न्यायाप्राधिकरणाचे प्रमुख सदस्य आणि सत्र न्यायाधीश एस. एम. मेनजोगे यांनी दिला आहे.

संजय अजिनाथ सानप असे वडकी येथे झालेल्या अपघातात जागीच मृत्यू झालेल्यांचे नाव आहे. या प्रकरणात लोणी काळभोर पोलीस स्टेशन येथे एका व्यक्तीविरोधात भारतीय दंड विधान कायदा कलम 279, 304 अे आणि मोटार वाहन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. मयत सानप हे 40 वर्षाचे होते. ते माथाडी हमाल आणि इतर श्रमजीवी कामगार मंडळाचे सभासद होते. तसेच इतर मंडळातर्फे त्यांना हमाल म्हणून वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या स्वरुपाचे काम मिळत होते. ते कुटूंबातील एकमेव कमवते होते. त्यांचा पत्नी, आई – वडिल आणि दोन लहान मुले असा परिवार आहे. त्यांच्या कुटुंबियांतर्फे ऍड. शशिकांत बागमार, ऍड. निनाद बागमार, ऍड. संदेश जायभाय यांनी येथील मोटार अपघात न्यायाधिकरण येथे नुकसानभरपाई मिळावी म्हणून दावा दाखल केला होता. यावर सुनावणी करत न्यायालयाने अर्ज दाखल केल्यापासून वार्षिक साडेसात टक्के व्याजाने वरील रक्कम देण्याचा आदेश दिला.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.