“हिंदुत्वाचे गुलाम…”; ज्ञानवापीच्या ASI रिपोर्टवर असदुद्दीन ओवैसी संतापले

ASI Report on Gyanvapi : ज्ञानवापी मशिदी संदर्भात भारतीय पुरातत्व विभागाचा रिपोर्ट समोर आला आहे. यात ज्ञानवापी मशिदीच्या ठिकाणी एक मोठे हिंदू मंदिर होते असा दावा करण्यात आला आहे. या रिपोर्टवर ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादूल मुस्लिमीनचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी आक्षेप घेतला.
ओवेसी यांनी एएसआय सर्वेक्षण अहवाल कठोरपणे नाकारला आहे. “भारतीय पुरातत्व विभाग हे हिंदुत्वाची गुलाम झाली आहे. हा रिपोर्ट केवळ अंदाजावर आधारित आहे. वैज्ञानिक अभ्यासाचा यात अभाव आहे. हा अहवाल व्यावसायिक पुरातत्वशास्त्रज्ञ किंवा इतिहासकारांच्या कोणत्याही गटाद्वारे शैक्षणिक तपासणीसमोर टिकू शकणार नाही. हा अहवाल वैज्ञानिक अभ्यासाची खिल्ली उडवतो कारण तो अनुमानावर आधारित आहे,” असे म्हणत असदुद्दीन ओवैसी यांनी संताप व्यक्त केला.
This wouldn’t stand academic scrutiny before any set of professional archaeologists or historians. The report is based on conjecture and makes a mockery of scientific study. As a great scholar once said “ASI is the handmaiden of Hindutva“ https://t.co/vE76X1uccM
— Asaduddin Owaisi (@asadowaisi) January 25, 2024
ASI सर्वेक्षण अहवाल
एएसआय सर्वेक्षण अहवाल एकूण ८३९ पानांचा असल्याचे सांगण्यात येत आहे. एसआय अहवालाचा एक भाग असे सांगतो की, स्थापत्य अवशेष, उघड वैशिष्ठ्ये आणि कलाकृती, शिलालेख, कला आणि शिल्प यांचा वैज्ञानिक अभ्यास/सर्वेक्षणाच्या आधारे अभ्यास करण्यात आला. असे म्हणता येईल की सध्याची रचना तयार होण्यापूर्वी तेथे एक हिंदू मंदिर अस्तित्वात होते. मशीद बांधण्यासाठी खांब आणि प्लास्टरचा थोडासा बदल करून पुन्हा वापर करण्यात आल्याचे अहवालात म्हटले आहे. हिंदू मंदिराच्या खांबांमध्ये थोडासा बदल करून नवीन रचनेसाठी वापरण्यात आला. खांबावरील नक्षीकाम पुसून टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला.
यासोबतच जुन्या हिंदू मंदिरातील 32 शिलालेख सापडल्याचीही माहिती देण्यात आली आहे. देवनागरी, ग्रंथा, तेलगू आणि कन्नड भाषांमध्ये लिहिलेले शिलालेखही येथे सापडले आहेत. तळघरात हिंदू देवी-देवतांच्या मूर्तीही सापडल्या आहेत, ज्या मातीखाली गाडल्या गेल्या होत्या. हे पूर्णपणे स्पष्ट आहे की पश्चिम भिंत हिंदू मंदिराचा एक भाग आहे. 17 व्या शतकात हिंदू मंदिर पाडण्यात आले आणि सध्याची रचना त्याच्या ढिगाऱ्यातून तयार करण्यात आली होती.





