नवी दिल्ली : इंडियन प्रीमिअर लीग 2025 च्या पर्वापूर्वी मेगा ऑक्शन होणार आहे आणि त्यासाठी BCCI प्रत्येक फ्रँचायझीला नेमक्या किती खेळाडूंना संघात कायम राखण्याची संधी देते हे पाहणे महत्वाचे असणार आहे. आयपीएल 2025 मध्ये सर्व फ्रँचायझी आपल्या टीममध्ये बरेच बदल करताना दिसतील. मात्र त्या अगोदर ILT20 ही स्पर्धा होणार आहे. ILT20 हा तिसरा सिझन असणार आहे. ILT20 चा तिसरा सीझन 11 जानेवारी 2025 रोजी सुरू होणार आहे तर अंतिम सामना 9 फेब्रुवारी 2025 रोजी खेळवला जाणार आहे. या अगोदर या लीगममध्ये मुंबई इंडियन्स फ्रँचायझीच्या MI Emirates संघाने त्यांच्या रिटेन ( संघात कायम राखलेल्या) केलेल्या व रिलीज ( करारमुक्त ) केलेल्या खेळाडूंची नावे जाहीर केली आहेत. या खेळाडूंना केले रिटेन ( संघात कायम ठेवले) किरॉन पोलार्ड ड्वेन ब्राव्हो निकोलस पूरन आंद्रे फ्लेचर जॉर्डन थॉम्पसन अकेल होसीन कुसल परेरा व्यासकांत विजयकांत वकार सलामखेल नॉस्टुश केंजिगे फजलहक फारुकी मुहम्मद वसीम मुहम्मद रोहिद डॅनियल मौसली या खेळाडूंना केले रिलीज ( संघातून केले करारमुक्त) अंबाती रायुडू आसिफ खान कोरी अँडरसन भानुका राजपक्षे ख्रिस्तोफर बेंजामिन मॅकेनी क्लार्क मोनांक पटेल ओडियन स्मिथ ट्रेंट बोल्ट रीस टोपली टिम डेव्हिड विल स्मीड जहूर खान