प्रचारासाठी पालिकेकडून 130 जागा उपलब्ध

-उपनगरांसह शहरातील मध्यवर्ती भागातील जागांचा समावेश
– अडचीत सापडलेल्या राजकीय पक्षांची सोय

पुणे  – लोकसभा निवडणुकीच्या प्रचारसभा, मेळावे आणि कोपरासभांसाठी महापालिकेकडून तब्बल 130 जागा राजकीय पक्षांना उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. प्रामुख्याने उपनगरांमधील या जागा असून शहरातील मध्यवर्ती भागातील जागांचाही यात समावेश असल्याची माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली. या सर्व जागा पालिकेच्या मालकीच्या असून रेडीरेकनरच्या दराने भाडे आकारणी करून त्या दिल्या जाणार असल्याचे महापालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.

महापालिकेकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, प्रामुख्याने या जागा शाळांची मैदाने असून ऍमेनिटी स्पेस तसेच वेगवेगळ्या आरक्षणापोटी पालिकेच्या ताब्यात आल्या असल्या तरी, अद्याप त्या रिकाम्या असल्याने त्यांच्या ठिकाणीच ही परवानगी दिली जाणार आहे. राजकीय पक्षांना शहरात प्रचारासाठी मर्यादीत जागा उपलब्ध असल्याने त्यांची मोठी अडचण झाली होती. मात्र, महापालिकेकडून या जागा उपलब्ध करून दिल्याने त्यांची मोठी सोय होणार आहे. या जागा 1 हजार चौरस मीटरपासून ते पन्नास हजार चौरस मीटरपर्यंतच्या असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. तसेच, या सर्व जागा पालिकेच्या जागा वाटप नियमावली 2009 नुसारच देण्यात येणार असल्याचेही प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.