पुणे: कोथरुड येथे सुट्टीनिमीत्त नातेवाईकाच्या घरी आलेल्या एका 13 वर्षाच्या मुलीवर शेजारच्याने बलात्कार केला. याप्रकरणी कोथरुड पोलिसांनी प्रसाद संजय गाडे(रा.शास्त्रीनगर, कोथरुड) याला अटक केली आहे.
याप्रकरणी एका 35 वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांच्याकडे त्यांच्या बहिणीची मुलगी शाळेला सुट्टी लागल्यान रहावरयास आली होती. ती शेजारी रहाणाऱ्या आरोपीच्या घरी टीव्ही पहायला गेली असता त्याने मुलीवर बलात्कार केला. याप्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक हजारे करत आहेत.