जकार्ता : इंडोनेशियातील उत्तर मालुकू येथे मंगळवारी एक प्रवासी जहाज बुडाल्याने 13 जण बेपत्ता झाले आहेत. मीडिया रिपोर्टमध्ये ही माहिती देण्यात आली आहे.
इंडोनेशियाच्या पूर्वेकडील उत्तर मालुकू प्रांतात 77 जणांना घेऊन जाणारे एक प्रवासी जहाज बुडाले, अशी माहिती सिन्हुआ या वृत्तसंस्थेने राष्ट्रीय शोध आणि बचाव कार्यालयाच्या प्रवक्त्याच्या हवाल्याने दिली. या घटनेनंतर आतापर्यंत 13 जण बेपत्ता असल्याचे सांगण्यात येत आहे.