1280 जण करोनामुक्त
Updated On:

सातारा – जिल्ह्यातील विविध रुग्णालयातून आणि करोना केअर सेंटरमधून शुक्रवारी संध्याकाळपर्यंत 1280 नागरिकांना घरी सोडण्यात आले आहे. तर 1160 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली. क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयातील 34, कराड उपजिल्हा रुग्णालय 21, फलटण उपजिल्हा रुग्णालय 50,
कोरेगाव 126, वाई 85, खंडाळा 74, रायगाव 106, पानमळेवाडी 212, मायणी 103, महाबळेश्वर 55, दहिवडी 41, खावली 45, तळमावले 26 व कृष्णा मेडिकल कॉलेजमधील 182 अशा एकूण 1160 जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहेत,अशी माहिती डॉ. चव्हाण यांनी दिली.





