सतर्क रहा ! महाराष्ट्रासह ‘या’ राज्यात आढळले दोन ‘नवे स्ट्रेन’ ; ब्रिटनच्या स्ट्रेनपेक्षाही जास्त घातक

नवी दिल्ली : देशात एकीकडे कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. अशातच महाराष्ट्र आणि केरळमध्ये कोरोनाचे दोन नवे स्ट्रेन सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. जगात पहिल्यांदा ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा स्ट्रेन सापडला होता. त्यानंतर जपान, दक्षिण ऑफ्रिकेमध्ये हा नवनवीन स्ट्रेन सापडू लागले होते. आता महाराष्ट्रात आणि केरळमध्ये सापडलेला हा नवीन स्ट्रेन यापेक्षा जास्त घातक असल्याची शक्यता PGIMER चंडीगढ़च्या संचालकांनी व्यक्त केली आहे.

देशात आढळलेल्या नव्या स्ट्रेनवर संचालकांनी, भारतात सापडलेला हा कोरोनाचा नवीन स्ट्रेन युरोपच्या स्ट्रेनपेक्षा जास्त घातक आहे. यामुळे हा स्ट्रेन वेगाने संक्रमन करण्याची शक्यता आहे. या परिस्थितीत नवीन कोरोना रुग्णांचा आकडा थोपविण्यासाठी प्रत्येकाने सावधानी बाळगावी. सध्या चंदीगढच्या विविध रुग्णालयांमध्ये कोरोनाचे 55 रुग्ण आहेत. गेल्या दोन आठवड्यांत हा आकडा वाढला आहे.

महाराष्ट्र आणि केरळमध्ये देशातील सर्वाधिक नवीन कोरोनाबाधित सापडू लागले आहेत. संशोधकांना या दोन राज्यांत कोरोनाचे दोन वेगवेगळे नवीन स्ट्रेन N440K आणि E484Q सापडले आहेत. या दोन्हीमध्ये परस्पर संबंध नाही, असे केंद्र सरकारचे म्हणणे आहे. आयसीएमआरनुसार हे कोरोना स्ट्रेन सध्याच्या वाढत्या रुग्णांच्या संख्येला कारणीभूत नाहीत.

नीती आयोगाचे सदस्य (आरोग्य) व्ही. के पॉल यांनी सांगितल्यानुसार, देशात SARS-CoV-2 या युकेच्या स्ट्रेनचे आतापर्यंत 187 लोकांना संक्रमण झाले आहे. दक्षिण आफ्रिकेच्या स्ट्रेनमुळे आतापर्यंत सहा लोक सापडले आहेत. ब्राझिलच्या कोरोनापासून एक व्यक्ती संक्रमित आहे. आतापर्यंत 3,500 लोकांची चाचणी करण्यात आली आहे. SAR4-CoV-2 चे भारतात जे नवीन दोन व्हेरिअंट सापडलेत ते महाराष्ट्र, केरळ आणि तेलंगानामध्ये या राज्यांमध्ये होते. या दोन्ही नवीन स्ट्रेनच्या जिनोमवर संशोधन सुरु झाले आहे. देशात सध्या दीड लाखांपेक्षा कमी अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.